Icon

परिचय

महासंघाबद्दल

मराठी बांधकाम व्यवसायिक महासंघ (MBVM) ही महाराष्ट्रातील मराठी बांधकाम व्यवसायिकांची राज्यस्तरीय शिखर (Apex) संघटना आहे. महासंघाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तसेच CIDCO, NAINA, MMRDA, PMRDA, MIDC आणि इतर विशेष नियोजन प्राधिकरण (Special Planning Authority) क्षेत्रांमध्ये मराठी बांधकाम व्यवसायिक असोसिएशन स्थापन करून सर्व मराठी विकासकांना एका संघटनात्मक व्यासपीठावर आणणे हा आहे.

कार्यपद्धती

कार्यपद्धती

इच्छुक विकासकांनी वेबसाईटवरील किंवा विविध माध्यमांवरील QR Code स्कॅन करून प्राथमिक नोंदणी फॉर्म भरायचा आहे. संबंधित जिल्हा किंवा विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रात १५ किंवा त्यापेक्षा अधिक विकासकांची नोंदणी झाल्यानंतर महासंघ त्या ठिकाणी विशेष बैठक आयोजित करेल.

या बैठकीत स्थानिक असोसिएशनची स्थापना, पदाधिकाऱ्यांची निवड, संविधानाचा स्वीकार, नोंदणी प्रक्रिया आणि महासंघाशी संलग्नतेबाबत निर्णय घेतले जातील.

ऑनलाइन नोंदणी

QR Code स्कॅन करा

प्राथमिक नोंदणीसाठी QR Code स्कॅन करा

इच्छुक विकासकांनी प्राथमिक नोंदणीसाठी खालील QR Code स्कॅन करून नोंदणी फॉर्म भरावा.

१५+ विकासकांची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठिकाणी विशेष बैठक आयोजित केली जाईल.
MBVM QR Code
QR Code स्कॅन करून नोंदणी करा

महासंघाशी संलग्नता

महासंघाशी संलग्नता

असोसिएशनची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्या असोसिएशनचा मराठी बांधकाम व्यवसायिक महासंघाशी Affiliation MoU (सामंजस्य करार) केला जाईल. या करारानुसार सर्व संलग्न असोसिएशन महासंघाचे संविधान, नियमावली आणि धोरणांचे पालन करतील तसेच महासंघाचा अधिकृत लोगो वापरतील.

असोसिएशनकडून सदस्य शुल्कातून निश्चित केलेले योगदान महासंघाकडे जमा करण्यात येईल. सदस्यसंख्येच्या प्रमाणात संबंधित असोसिएशनला महासंघामध्ये प्रतिनिधित्व मिळेल.

जबाबदाऱ्यांचे विभाजन

जबाबदाऱ्यांचे विभाजन

स्थानिक असोसिएशन

  • स्थानिक सदस्यांचे प्रश्न सोडविणे
  • स्थानिक प्रशासन व प्राधिकरणांशी समन्वय
  • जिल्हास्तरीय कार्यक्रम व सदस्य सेवा

मराठी बांधकाम व्यवसायिक महासंघ

  • राज्यस्तरीय व सामायिक प्रश्न शासनापुढे मांडणे
  • धोरणात्मक प्रतिनिधित्व
  • कायदेशीर व तांत्रिक मार्गदर्शन
  • प्रशिक्षण, नेटवर्किंग व उद्योग विकास
  • सर्व संलग्न असोसिएशनमध्ये समन्वय राखणे

संघटनात्मक रचना

संघटनात्मक रचना

महासंघ कोणत्याही व्यक्तीला थेट सदस्यत्व देणार नाही. प्रत्येक विकासक हा प्रथम आपल्या जिल्हा किंवा विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रातील असोसिएशनचा सदस्य असेल. त्या सर्व असोसिएशनचे प्रतिनिधित्व करणारी राज्यस्तरीय शिखर संघटना म्हणजे मराठी बांधकाम व्यवसायिक महासंघ असेल.

आमचे ध्येय

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक विशेष नियोजन प्राधिकरण क्षेत्रात मराठी बांधकाम व्यवसायिक असोसिएशन स्थापन करून, सर्व मराठी विकासकांना एकाच संघटनात्मक छत्राखाली आणणे आणि त्यांच्या स्थानिक व राज्यस्तरीय प्रश्नांसाठी प्रभावी, सक्षम व एकसंध प्रतिनिधित्व निर्माण करणे.

एक महासंघ • प्रत्येक जिल्ह्यात असोसिएशन • एकच लोगो • एकच ओळख • एकसंध महाराष्ट्र